महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भोकरदनमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू - Jalana Crime news

ज्ञानेश्वर हा गट क्रमांक 147 मधील शेतातील गहू, ज्वारी या पिकांना पाणी देण्यासाठी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शेतात गेला होता. विद्युतपंप सुरू करत असताना अचानक विजेच्या खांबाला धक्का लागल्याने शॉक बसला.

Youth dies in Bhokardan
विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By

Published : Dec 12, 2019, 12:29 AM IST

जालना- रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप सुरु करण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरूणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. ही घटना भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव थोटे येथे मंगळवारी घडली. ज्ञानेश्वर हरिश्चंद्र तरमाळे (वय 18) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा - जालना : महिला पोलीस उपनिरीक्षकावर चाळीस हजारांची लाच मागितल्याप्रकणी गुन्हा दाखल

ज्ञानेश्वर हा गट क्रमांक 147 मधील शेतातील गहू, ज्वारी या पिकांना पाणी देण्यासाठी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शेतात गेला होता. विद्युतपंप सुरू करत असताना अचानक विजेच्या खांबाला धक्का लागल्याने शॉक बसला. यामधे ज्ञानेश्वर दूरवर फेकला गेला. सदर प्रकार कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी त्याला उपचारासाठी राजूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ज्ञानेश्वर हा राजूरच्या मोरेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता.

ABOUT THE AUTHOR

...view details