महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भोकरदनमध्ये 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू; दिवाळी सणाच्या दिवशी दु:खद घटना - भोकरदन लेटेस्ट न्यूज

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात दिवाळी सणाच्या दिवशी दु:खद घटना घडली. तालुक्याच्या वालसावंगी गावात अविनाश हिरालाल बोडखे या 14 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

अविनाश हिरालाल बोडखे
अविनाश हिरालाल बोडखे

By

Published : Nov 16, 2020, 3:48 PM IST

जालना - भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावातील अविनाश हिरालाल बोडखे या 14 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अविनाश मित्रांसोबत नदीवर पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. वालसावंगी गाव शिवारातील नदीवर ही घटना घडली.

दिवाळी सणाच्या दिवशी दु:खद घटना -

रविवारी सकाळी अविनाश आईवडीलांना शेतात चाललो, असे सांगून घराबाहेर पडला. मात्र, अविनाश शेताकडे न जाता मित्रासोंबत पोहायला नदीत उतरला. नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बूडून मृत्यू झाला. शेताकडे कामानिमित्त जात असलेल्या मजुरांना त्याचा मृतदेह पाण्यांवर तरंगताना दिसला. ही बाब त्यांनी ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली. घटनेची माहिती मिळताच, अविनाशच्या कुटुंबीयांनी नदीकडे धाव घेतली. दिवाळी सणाच्या दिवशी दु:खद घटना घडल्याने वालसावंगी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा -इथिओपियामध्ये बसवर दहशतवादी हल्ला; ३४ ठार

ABOUT THE AUTHOR

...view details