जालना - भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील तरुणाचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. मुरलीधर उर्फ अर्जुन सारंगधर पन्हाळे (वय ३० रा. कोळेगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शेतामध्ये घेवड्यावर औषधी फवारणी करताना डाव्या पायाच्या अंगठ्याला सर्प दंश केल्याचे त्याच्या निदर्शनास आले. मुरलीधरने ही बाब घरी येवून सांगितली. गावातील नागरिकांनी त्याला उपचारासाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
शेतात काम करत असताना सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू - सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू
शेतात काम करत असताना डाव्या पायाच्या अंगठ्याला सर्पदंश झाला. त्यामुळे 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कोळेगावात घडली आहे.
![शेतात काम करत असताना सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू मृत मुरलीधर पन्हाळे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-03:03:28:1618047208-mh-jal-01-sarpdanshdeth-mhc10041-10042021150025-1004f-1618047025-751.jpg)
मृत मुरलीधर पन्हाळे
मुरलीधरच्या पश्चात आई - वडील, पत्नी, १ मुलगी आणि १ मुलगा असा परिवार आहे. मुरलीधर हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. कुटंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. कुटुंबाचा आधार गेल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भोकरदन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक नामदेव जाधव करीत आहेत.