जालना - जालना रेल्वे स्थानकात संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. मृत व्यक्तीच्या शरीराचे अनेक तुकडे झाले आहेत. दरम्यान या व्यक्तीजवळ आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेले पत्रही पोलिसांना सापडले आहे.
रेल्वेखाली उडी घेऊन तरुणाची आत्महत्या - जालन्यात तरुणाची आत्महत्या
मनमाड-नांदेड मराठवाडा एक्सप्रेसखाली २३ वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
तरुणाची आत्महत्या
मिळालेल्या माहिती नुसार पारिवारिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे लिहिले आहे. मनमाड-नांदेड मराठवाडा एक्सप्रेसखाली या व्यक्तीने आत्महत्या केली आहे.उपेंद्र आबासाहेब खरात (वय 23 वर्ष,रा. सिद्धार्थ नगर, मातोश्री लॉन जवळ) असे त्याचे नाव आहे. मृत व्यक्ती विवाहित असून एक लहान मुलगाही असल्याचे तपासात पुढे आहे. आहे.