महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्जबाजारीपणाला कंटाळून जालन्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून भोकरदन तालुक्यातील गारखेडा येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. समाधान शेनफड साबळे (वय ३६) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

भोकरदन

By

Published : Nov 17, 2019, 11:58 AM IST

Updated : Nov 17, 2019, 12:41 PM IST

जालना - कर्जबाजारीपणाला कंटाळून भोकरदन तालुक्यातील गारखेडा येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. समाधान शेनफड साबळे (वय ३६) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि.१६) उघडकीस आली.

समाधानने स्टेट बँक ऑफ हैदराबादचे ४ लाख रुपयांचे कर्ज आणि इतर काही संस्थांकडून कर्ज घेतले होते. या वर्षी निसर्गाने कशीबशी साथ दिली होती. मात्र, ऐनवेळी परतीच्या पावसाने मोठे नुकसान केल्याने डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा उतरणार, या चिंतेत साबळे होते. समाधान शुक्रवारी सकाळपासून घरातून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली होती. मात्र, अनेक ठिकाणी चौकशी करून तो सापडत नव्हता. मात्र, शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास समाधानचा मृतदेह गारखेडा शिवारातील जालना रस्त्यालगत असलेल्या बाजीराव साबळे यांच्या गट क्रमांक 179 मधील विहिरीमध्ये सापडला. ही बातमी गावात समजताच एकच खळबळ उडाली.

समाधान शेनफड साबळे

हेही वाचा -कामगार आणि कंपनी व्यवस्थापनात वाद; औद्योगिक वसाहतीमध्ये तणावाचे वातावरण

या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तत्काळ पंचनामे करण्यासाठी सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. पंचनामा करून मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत शेतकरी समाधान साबळे यांना 11 वर्षांचा मुलगा असून त्यांच्या पश्चात पत्नी आई एक भाऊ दोन बहिणी आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर गारखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.

Last Updated : Nov 17, 2019, 12:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details