जालना - अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना 30 जूनला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राजूर-जालना रोडवर घडली. संजय उत्तम नागरे (वय 30 वर्ष रा. गोंधनखेडा ता. देऊळगाव), असे मृत तरुणाचे नाव आहे. संजय हे सिझेंटा कीटकनाशक औषधी कंपनीत कामाला होते.
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू - जालना न्यूज
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गडली. ही घटना राजूर-जालना रोडवर घडली.
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू
अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. डोक्यातून मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोडके, विष्णू बुणगे, संतोष वाढेकर, राजू उनगे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच संजय यांना राजूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.