महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जागतिक मृदा दिन: बदनापूरमध्ये शेतकरी मेळाव्यात कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन - आमदार नारायण कुचे न्यूज

राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी राज्यभरात दिलेल्या मृदा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार बदनापूरमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

जागतिक मृदा दिन
जागतिक मृदा दिन

By

Published : Dec 5, 2020, 4:17 PM IST

बदनापूर (जालना)- जागतिक मृदा दिनाचे औचीत्य साधून बदनापूर तालुक्यातील गोकूळवाडी येथे कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात मृदा दिनाचे महत्त्व शेतकऱ्यांना सविस्तर सांगण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी राज्यभरात दिलेल्या मृदा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार बदनापूरमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून बदनापूरचे आमदार नारायण कुचे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार नारायण कुचे म्हणाले, की माती ही आपल्या आईसारखी असते. त्यामुळे तिची काळजी घेऊन उचित परिक्षण करावे. तिची झिज होऊ न देता काळजी घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

हेही वाचा-बुलडाण्याच्या बालसुधारगृहात दोन मुलांची गळफास घेवून आत्महत्या

शेतकरी मेळाव्यामध्ये मृदा आरोग्यामध्ये सेंद्रिय खतांचे असलेले महत्त्व कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच माती परिक्षण करून पिकांची निवड केल्यास उत्पादन क्षमता वाढते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. माती परिक्षणासाठी मोफत व्यवस्था करण्यात येणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी माती परिक्षण व त्याचे फायदे यांची अद्ययावत माहिती देणारी पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली.

हेही वाचा-कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी बाजार समिती संचालकांनी दिला आंदोलनाचा इशारा

मेळाव्याला उपविभागीय कृषी अधिकारी कोकाटे, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, डॉ. अश्विनी बोडखे, अनिल कोलते, सरपंच गंगाधर भंडागे, बळीराम भडांगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाऊसाहेब मगरे, जना कोलते, पंढरीनाथ पवार, अशोक पवार, अंकुश शेळके, गजानन भंडागे, कुंडलिक लोखंडे, सुशीलाबाई लोखंडे, गयाबाई हिवाळे, रूख्मण पवार आदी शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक आरोग्य जपणे महत्त्वाचे असते. त्याबाबत जनजागृती होण्यासाठी जागतिक मृदा दिन ५ सप्टेंबरला जगभरात साजरा केला जातो.

ABOUT THE AUTHOR

...view details