जालना - मुंबई येथून आलेल्या 120 महिलांच्या पथकाने जालन्यात दहीहंडी फोडली. शहरात विविध ठिकाणी या पथकाच्या वतीने दहीहंडी फोडण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहिली दहीहंडी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जवाहर बाग पोलीस चौकी समोर फोडण्यात आली.
जालन्यात महिलांच्या पथकाने फोडली दहीहंडी - state minister arjun khotkar
जवाहर बाग यानंतर बडी सडक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधीचमन आणि नूतन वसाहत अशा पाच ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
भाऊ कोरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतून हे पथक जालन्यात आले आहे. जवाहर बाग यानंतर बडी सडक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधीचमन आणि नूतन वसाहत अशा पाच ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पथकात सर्व महिलाच सहभागी आहेत .जवाहर बाग परिसरात 5 पाच थरांचे मनोरे उभारून ही दहीहंडी फोडण्यात आली. दहीहंडी फुटल्यानंतर टँकरद्वारे पाण्याचे फवारे उडवून गोपाळांनी जल्लोष केला. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावतीने या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.