महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भोकरदन तालुक्यात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या - पिंपळगाव रेणुकाई

जालना जिल्ह्याच्या पिंपपळगाव रणुकाई (ता. भोकरदन) येथील मैनाबाई दिनेश बोर्डे या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मैनाबाई बोर्डे
मैनाबाई बोर्डे

By

Published : Dec 5, 2019, 7:43 AM IST

जालना- भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील मैनाबाई दिनेश बोर्डे (वय 35 वर्षे) या महिलेने राहत्या घरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बेशुद्धावस्थेत महिलेला उपचारासाठी गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, वैद्यकीय अधिकाऱ्याने तिला मृत घोषित केले.


या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने पुढील तपास सहाय्यक पोलीस निरक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रकाश सिनकर हे करीत आहे.

हेही वाचा - जालन्यात कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details