महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Woman Suicide With Childrens Jalna : जालन्यात स्वतःच्या चार चिमुरड्यांसह महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - Accuse Arrested By Godi Police

नवऱ्याला व्यसन जडल्याने त्रासलेल्या बायकोने स्वतःच्या चार मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली ( Woman Suicide With Childrens Jalna ) आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील हदगाव ( Suicide By Jumping Into Well ) येथे ही घटना घडली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Woman Suicide With Childrens Jalna
महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

By

Published : Dec 31, 2021, 4:45 PM IST

Updated : Dec 31, 2021, 4:59 PM IST

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील एका विवाहितेने कुटूंबिक वादातून पोटच्या चार लेकरासह विहिरीत उडी ( Suicide By Jumping Into Well) घेऊन आत्महत्या केल्याची केली ( Woman Suicide With Childrens Jalna ) आहे. हदय पिळवून टाकणाऱ्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जालन्यात स्वतःच्या चार चिमुरड्यांसह महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

गंगासागर ज्ञानेश्वर अडाणी (वय 32), भक्ती (वय 13), ईश्वरी (वय 11), अक्षरा (वय 9) व मुलगा युवराज (वय 7) अशी त्यांची नावे आहेत.अंबड तालुक्यातील घुंगर्ड हादगाव गावातील ज्ञानेश्वर प्रल्हाद अडाणी हे पत्नी गंगासागर अडाणी व तीन मुली आणि एक मुलासह गावात राहतात.

काल ३० डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान गंगासागर ह्या तीन मुली व मुलासह शेतात चक्कर मारायला गेल्याचे अनेकांनी पाहिले. गंगासागर यांनी मुलामुलींसह सायंकाळी 5.30 पर्यंत शेतातच वेळ घालवला. सात वाजेपर्यंत ही गंगासागर व मुलं- मुली घरी परतले नसल्याने ज्ञानेश्वर अडाणी व गावातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला.

परिसरातील सर्व विहिरी व जायकवाडी डावा कालवा परिसर पिंजून काढला. मात्र, त्या आढळून आल्या नाही. रात्री झाली घरी न आल्यामुळे घरच्यांनी व गावातील काही लोकांनी त्यांचा शोध सुरू ठेवला. गावकरी व अडाणी कुटुंबातील सदस्य यांनीही आजूबाजूच्या शेतात विहिरी पिजून काढल्या.त्यानंतर रात्रभर शोध घेऊन ही सापडले नव्हते. परंतु सकाळीच काहींच्या नजरेत अडाणी यांच्या शेताशेजारच्या विहिरीत या पाचही जणांचे मूतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले.

गंगासागर अडाणी हिने आपल्या चार मुलांसह विहिरीत उडया मारून आत्महत्या केली असल्याचे आढळून आले. दरम्यान, या घटनेची माहिती गोदी पोलीस ठाण्यात ( Godi Police Station ) दिल्याने घटनास्थळी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ कर्मचारी घेऊन याठिकाणी हजर झाले. या पाचही जणांचे मृतदेह विहिरी बाहेर काढून शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोंदी पोलिसांनी ज्ञानेश्वर अडाणी यांनी ताब्यात घेतले ( Accuse Arrested By Godi Police ) आहे.

Last Updated : Dec 31, 2021, 4:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details