जालना - शहरातील होटेल स्वर्गमध्ये चोरट्यांनी 23 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास चोरी करून दोन लाख 63 हजार रुपयांच्या विदेशी दारूवर हात साफ केला. दरम्यान हॉटेलमध्ये चोरी करणारे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. चोरी करून परत गेल्या नंतर सीसीटीव्ही असल्याचे लक्षात आल्यानंतर परत येऊन कॅमेऱ्याचे वायर तोडताना चोरटे सीएटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
“ स्वर्ग” मध्ये चोरांचा डल्ला: 2 लाख 63 हजारांची दारू लंपास, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद - “ स्वर्ग” मध्ये चोरांचा डल्ला: 2 लाख 63हजारांची दारु लंपास ;चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद
जालना शहरातील स्वर्ग या हॉटेलमध्ये घुसून लाखो रुपयांची दारू चोरली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांचा शोध जालना पोलीस घेत आहेत.
![“ स्वर्ग” मध्ये चोरांचा डल्ला: 2 लाख 63 हजारांची दारू लंपास, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद Wine Robbery in Jalana](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6914171-735-6914171-1587661792340.jpg)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने 19 मार्चपासून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून जुना जालन्यातील उड्डान पुलाजवळ असलेल्या, स्वर्ग हॉटेल अँड बार रेस्टॉरंटला कुलूप होते. परंतु, हॉटेलच्या देखभालीसाठी रितेश गुलावेकर आणि निवृत्ती गोपाळ फिटाले हे दोन कामगार कार्यरत होते. दरम्यान, आज पहाटे निवृत्ती फटाले याच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून चोरट्यांनी स्वर्ग हॉटेलचे शटर उघडले आणि हॉटेलमधील विविध प्रकारच्या विदेशी दारूच्या बॉटल चोरून नेल्या. नंतर हॉटेलचे मालक दिगंबर रघुनाथ पेरे यांनी येऊन पाहणी केली असता दोन लाख 63 हजार यांच्या दारू बॉटलची चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत पोलिसांना आरोपी सापडलेले नाहीत.