महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lok sabha Election: जालना लोकसभेसाठी 64.05 टक्के मतदान

जालना लोकसभा मतदारसंघात अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात उमेदवारीवरुन वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ राज्यभर चर्चेत होता.

जालना लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरूवात

By

Published : Apr 23, 2019, 7:50 AM IST

Updated : Apr 23, 2019, 10:11 PM IST

जालना- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज जालना मतदारसंघात मतदान झाले. सकाळी 7 वाजल्यापासून जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदानाला सुरूवात झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे पाचव्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून विलास औताडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ठिकाणी रात्री उशीरा आलेल्या माहितीनुसार जालना लोकसभेसाठी 64.05 टक्के इतके मतदान झाल्याची माहिती आहे.

जालन्यात मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद; ९ वाजेपर्यंत ९.२१ टक्के मतदान

Live Updates -

  • जालना लोकसभेसाठी 64.05 टक्के मतदान
  • 05.00 - जालन्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 59.91 टक्के मतदान
  • 03.00 pm- जालनामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 49.40 टक्के मतदान
  • 01.00 pm -जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 37.91 टक्के मतदान
  • 11.00 am - जालना मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 22.84 टक्के मतदान.
  • 09.00 am - जिल्ह्यात पहिल्या दोन तासांत 9.21 टक्के मतदान.
  • 07.30 am - रावसाहेब दानवे यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • 07.00 am - जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात.
Last Updated : Apr 23, 2019, 10:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details