महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना शहरात रॅली व पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती - lok sabha

पथनाट्याच्या माध्यमातून मतदार, मतदानाला कसे टाळतात हे दाखवून ते न टाळण्यासाठी आवाहन करण्यात आले. शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता "सारे काम छोड दो, सबसे पहले वोट दो" असा नारा ही विद्यार्थ्यांनी दिला.

पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती

By

Published : Apr 22, 2019, 12:31 PM IST

जालना - जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि विविध संस्थांच्यावतीने दिनांक १० रोजी जालना शहरातून रॅली काढून तसेच पथनाट्य घोषवाक्य च्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यासाठी आवाहन करण्यात आले. सकाळी मोती बागेपासून निघालेली ही रॅली गांधीचमन, नवीन जालना, बडी सडक मार्ग, शिवाजी पुतळा येथे राष्ट्रगीताने विसर्जित करण्यात आली.

पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती

मोती बागेपासून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी रॅलीची सुरुवात करून दिली. त्यानंतर विविध शाळा महाविद्यालय सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आणि सहकार्याने ही रॅली विविध घोषणा देऊन गांधीचमन सदर बाजार मार्केट शिवाजी पुतळा येथे आली. शिवाजी पुतळा येथे पथनाट्याच्या माध्यमातून मतदार, मतदानाला कसे टाळतात हे दाखवून ते न टाळण्यासाठी आवाहन करण्यात आले. शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता "सारे काम छोड दो, सबसे पहले वोट दो" असा नारा ही विद्यार्थ्यांनी दिला. शिवाजी पुतळा येथे उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून राष्ट्रगीताने या रॅलीचा समारोप करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details