जालना - सध्या सर्वत्र पीकांची परस्थिती चांगली आहे. मात्र, या चांगल्या पिकांसोबतच विविध प्रकारचे रोग ही पिकावर पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणीच्या औषधांमध्ये रासायनिक औषधांचा वापर कमी करावा, महागड्या औषधांचा वापर टाळून शेतीवरील खर्च कमी करावा असे आवाहन पुणे कृषी आयुक्तालयाचे कृषी उपसंचालक व्ही.एम. हिरेमठ यांनी केले. जालना तालुक्यातील सामनगाव आणि माळी पिंपळगाव गावातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांनी पीक पाहणी केली.
महागड्या रासायनिक औषधाचा वापर टाळा, खर्च कमी करा - व्ही.एम. हिरेमठ - पिकावर कीड
पुणे कृषी आयुक्तालयाचे कृषी उपसंचालक व्ही.एम. हिरेमठ यांनी पीक पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, रासायनिक फवारण्या करुन हीच औषधे आपल्या पोटात जातात. यामुळे विविध प्रकारचे रोग उद्भवत आहेत. हेच अन्न आपण पुढच्या पिढीला खाऊ घालणार आहोत का? याचाही विचार शेतकऱ्यांनी करण्याची आता गरज आली आहे.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी एन. आर .कोकाटे, जालना तालुका कृषी अधिकारी ए .टी. सुखदेवे, बदनापूर तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांची उपस्थिती होती. सामनगाव येथील पीक पाहणी दरम्यान कृषी सहायकांनी शेतकऱ्यांना केलेल्या मार्गदर्शना विषयी माहिती विचारली. सोयाबीनवर पडलेल्या रोगाविषयी माहिती घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले की शेतकऱ्यांनी रासायनिक औषधांचा वापर करण्यापूर्वी त्यांची खरंच गरज आहे का? हे तपासून पाहावे. केवळ दुसरा शेतकरी करतो म्हणून आपण करू नये. जुन्या काळातील घरगुती उपाय म्हणजे निंबोळी अर्काची फवारणी करावी. जेणेकरून ही कीड कमी होईल. मात्र, सध्या पिकावर कीड पडली रोग पडला की शेतकरी उठतो आणि फवारणी करायला लागतो. फवारणी करणे हा शेवटचा पर्याय आहे. त्यापूर्वी अनेक उपाययोजना करता येतात ज्या कमी खर्चिक आणि आणि सोप्या आहेत.
रासायनिक फवारण्या करून हीच औषधे आपल्या पोटात जात आहेत आणि विविध प्रकारचे रोग उद्भवत आहेत. हेच अन्न आपण पुढच्या पिढीला खाऊ घालणार आहोत का? याचाही विचार शेतकऱ्यांनी करण्याची आता गरज आली आहे. ही कोणत्या एका शेतकऱ्याची जबाबदारी नसून ती सामाजिक बांधिलकी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वस्तातील उपाययोजना केल्या पाहिजेत, आणि पिकांवर पडलेले विविध रोग घालवले 25 टक्के उत्पादनात वाढ होईल. याच सोबत कृषी सहायकांनी वेळोवेळी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे अवलंबून त्याचा वापर करावा. त्यामुळे शेती वरील खर्च कमी होईल आणि खाण्यासाठी शुद्ध अन्न मिळेल. कापसावर पडलेल्या मीत्र कीड आणि शत्रू कीड याची त्यांनी माहिती दिली.