जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका करणारे शिवसंग्रमाचे नेते विनायक मेटे तसेच नरेंद्र पाटील यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे प्रत्युत्तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहे. राज्यात आरक्षणाप्रमाणे इतरही अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. तेही सोडविण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
इतरही महत्वाचे प्रश्न आहेत
मराठा आरक्षण हा विषय महत्त्वाचा आहेच, मात्र यासोबत राज्यात इतरही अनेक महत्त्वाचे विषय आहेत. आरक्षणाचा विषय फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादीत नाही तर सर्वोच्च न्यायालयात अशा अनेक राज्यांचा विषय आहे. फरक एवढाच आहे की, महाराष्ट्राप्रमाणे इतर कोणत्याही राज्यातील आरक्षणासाठी स्थगिती दिलेली नाही. महाराष्ट्रात स्थगिती मिळाली ही दुर्दैवी बाब आहे. आठ मार्चला या प्रकरणावर सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी आम्ही तयारी करीत आहोत असे चव्हाण यांनी सांगितले.