जालना -प्रभात फेरी ल गेलेल्या महिलांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडक दिली. यात एक महिला जागीच ठार झाली. तर अन्य दोन गंभीर जखमी झाल्या आहेत. ही दुर्घटना आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास वाटुर-परतुर रस्त्यावर घडली.
वाटूर परतुर रस्त्यावर मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आतमध्ये अवचार कंडारी हे गाव आहे. गावातील तीन महिला नेहमीप्रमाणे प्रभात फेरीसाठी (मॉर्निंग वॉक) आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास घरातून निघाल्या. त्या मुख्य रस्त्यावर आल्या असता मुख्य रस्त्यावरून घराकडे परत जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने या तिघांनाही ठोस दिली. त्यामध्ये पार्वताबाई अंबादास शिंदे (वय - 55) या जागीच ठार झाल्या. तर उषा गणेशराव नांगरे (वय 45) आणि सुशीला भाऊसाहेब नांगरे (वय 40) याही जखमी झाल्या आहेत. या दोघींनाही जालना येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.