महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सामाजिक संस्था व लोकसहभागातून बाजारवाहेगावची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल - bajarvahegaon drought free news

बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव हे गाव जालन्यापासून 35 कि.मी.अंतरावर असून एकेकाळी हे गाव मोंसबी उत्पादनासाठी जिल्ह्यामध्ये प्रसिध्द होते. या गावाची लोकसंख्या जेमतेम 5 हजार असून कायम नदीकाठी असूनही मागील कित्येक दिवसांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने इथला तरुण वर्ग पोटापाण्यासाठी गावाबाहेर नोकरी-धंद्यासाठी नाईलाजाने गेला आहे.

vanrai and crompton foundation help to bajarvahegaon village drought free in jalna
vanrai and crompton foundation help to bajarvahegaon village drought free in jalna

By

Published : Aug 24, 2020, 7:22 PM IST

बदनापूर (जालना) - मागील पाच ते सात वर्षांपासून बदनापूर तालुक्यातील बाजारवाहेगाव हे दुष्काळाचा सामना करत आहे. मोसंबीच्या बागांसाठी प्रसिध्द असलेला हा परिसर दुष्काळी परिस्थितीमुळे भकास होण्याच्या मार्गावर असतानाच वनराई या सामाजिक संस्थेने व लोकसहभागातून या भागात मोठ्या प्रमाणात खोलीकरण व बंधारे तयार केले. यामुळे यंदा या सर्व बंधाऱ्यात पाणी साठा झाल्यामुळे हा परिसर कायम दुष्काळमुक्त होण्यास मदत होणार आहे.

बदनापूर तालुक्यातील बाजारवाहेगाव हे गाव जालन्यापासून 35 कि.मी.अंतरावर असून एकेकाळी हे गाव मोंसबी उत्पादनासाठी जिल्ह्यामध्ये प्रसिध्द होते. या गावाची लोकसंख्या जेमतेम 5 हजार असून कायम नदीकाठी असूनही मागील कित्येक दिवसांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने इथला तरुण वर्ग पोटापाण्यासाठी गावाबाहेर नोकरी-धंद्यासाठी नाईलाजाने गेला आहे. या गावाला भविष्यात कधीही कोणत्याही सिंचन योजनेचे पाणी येणार नाही अशी या गावाची भौगोलिक रचना आहे. भरपूर शेतीवाडी असूून केवळ पाण्याची समस्या असल्याने गावात रोजगार नाही, तसेच आधुनिक शेती करता येत नाही.

पाण्याअभावी शेतीला जोडधंदा ही करता येत नसल्याने मागील पाच ते सात वर्षांपासून हा भाग दुष्काळी म्हणून ओळखला जाऊ लागला. पिण्याच्या पाण्यासाठी ही या गावाला जानेवारी ते पार जून-जुलैपर्यंत २० ते २५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सोमठाणा येथील तलावातून टँकरने पाणी पुरवठा होत होता. गेली कित्येक वर्ष गावाने दुष्काळाचे चटके सहन केले. या परिस्थितीचा विचार करून या गावाला पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाची सोय व्हावी म्हणून 2018 या वर्षी रवींद्र धारिया यांनी पुढाकार घेऊन या गावात जलसंधारणाची कामे सुरू केली. त्यासाठी जयवंत देशमुख व चंद्रकांत चव्हाण यांचेही मार्गदर्शन मिळाले त्यांच्या वनराई संस्था व मुंबईच्या क्रॉम्प्टन या कंपनीने एकत्र येऊन गावात जलसंधारणाच्या कामास सुरुवात केली. गावाच्याजवळ असलेल्या ओढ्यावर खोलीकरण व 3 सिमेंट बंधाऱ्याचे कामे त्यांनी लोकसहभागातून केली. २०१८ साली झालेल्या या कामामुळे व गावाजवळ खोलीकरण एक सिमेंट बंधारा झाला. या कामामुळे पाणी साचून २०१९ मध्ये हे गाव टँकमुक्त झाले.

वनराई व क्रॉम्प्टन यांनी लोकसहभागातून बाजार वाहेगाव शिवारात 4 बंधारे बांधले तर जवळपास 6 किलोमीटर नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे कामे पूर्ण केली. त्यामुळे शिवारातून वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी उपयोगात येऊ लागले त्यासोबतच मातीची धुप पण झाली नाही, त्याबरोबरच गावात ऐकून जवळपास 150 च्या वर शेततळे कृषी विभागाच्या सहकार्याने करण्यात आलेले आहेत. या शेततळ्यात जवळपास 80 कोटी लिटर पाणी शेतकरी आपल्या शेततळ्यामध्ये साठवू शकले, ह्यावर्षी जवळपास 75 ते 80 हेक्टर मोसबी, डाळींब, पेरू, सीताफळ फळबागेची वाढ झाली. गावाच्या विकासाबरोबर शिक्षणाचाही दर्जा उंचवला पाहिजे ह्या हेतूने जि. प. शाळेची दुरुस्ती, किचन शेडरूम व मोडकळीस आलेले वर्ग चांगल्या दर्जाचे केले 5 वर्ग खोल्याचे दुरुस्ती व रंगरंगोटीची कामे करण्यात आलेली आहेत.

या सर्व कामाकरिता वनराई मित्रमंडळाचे अध्यक्ष कृष्णा (सोनू) काळे, राजेंद्र चौधरी, राजू काळे, संजय सोनटक्के, भाऊसाहेब नरवडे, बाबुराव काळे, डॉ.भाऊसाहेब काळे, ज्ञानेश्वर काळे, उद्धव दीक्षित, सरपंच ज्ञानेश्वर काळे, ग्रामसेवक व समस्त गावकरी मंडळी यांचे सहकार्य मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details