जालनाVande Bharat Train :यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, रेल्वे विभागाने 2014 ते 2023 पर्यंत अत्यंत गतीने प्रगती केली आहे आणि सर्व देशभरात रेल्वे लाईन मोठ्या प्रगतीपथावर आपले काम करत असल्याचं मत यावेळी दानवे यांनी व्यक्त केलं. (Chhatrapati Sambhajinagar) तसंच येणाऱ्या 2024 मध्ये नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होणार असून पुन्हा मोठ्या जोमाने ते काम करणार आहेत. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरवणार असल्याचं मत दानवे यांनी व्यक्त केलं. तसंच यापूर्वीच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला फक्त 1600 कोटी रुपये मिळत होते. मात्र मोदी सरकारमध्ये बारा हजार कोटी रुपयांचे बजेट या रेल्वे विभागाला मिळाले आहे. तसंच 2024 पर्यंत देशातील प्रत्येक भागात रेल्वे लाईनचे विद्युतीकरण होणार असल्याची माहितीसुद्धा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली आहे.
यामुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना :भविष्यामध्ये जालना आणि छत्रपती संभाजी नगर हे इंडस्ट्रियल मॕग्नेट म्हणून तयार होत आहेत आणि ही दोन्ही शहरे भारताची आर्थिक राजधानी मुंबईशी जोडली जात असल्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला गती मिळणार आहे. तसंच वंदे भारत ही रेल्वे लातूर येथील कोच फॅक्टरीमध्ये बनवण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं. राम मंदिरावर आपल्या भावना व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, मी एक कारसेवक म्हणून राम मंदिर झाल्याबद्दल मनापासून समाधानी आहे. जो संघर्ष आम्ही केला त्या संघर्षाचं फळ आम्हा सर्वांना मिळालं आहे. कारण मी अठरा ते वीस वर्षांचा असताना बदायुँ जेलमध्ये राहिलो आहे. ज्यावेळेस गोळीबार झाला तसंच ज्यावेळेस वादग्रस्त इमारत तोडली त्यावेळेस सुद्धा मी त्या ठिकाणी होतो. त्या भावना ते दुःख आम्ही पाहिले आहे. त्यामुळे हा जो सुवर्णक्षण राम मंदिर उद्घाटनाचा आला आहे, तो आम्हा सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण आहे.