जालना -मुंबईतील आरे जंगल तोडीविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर गेले असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. या घटनेचा तीव्र निषेध म्हणून भोकरदन येथील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीकडून निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व बंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रदिप जोगदंडे यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी शासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलीस प्रशासनाला विवेदन देण्यात आले.
भोकरदन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने - aare news
आरे जंगल तोडी विरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी गेलेल्या बाळासाहेब आंबडेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याचा भोकरदन येथे वंचित बहुजन आघाडीकडून निषेध करण्यात आला.
यावेळी प्रदिप जोगदंडे, अॅड. हर्षवर्धन प्रधान, शिवाजी इंगळे, सुभाष सूरडकर, मिलिंद अंभोरे, विशाल मिसाळ, दिपक वेलदोडे, मंगेश पगारे, रमण पगारे, पंडित बोराडे, मिलिंद अंभोरे, राहूल दांडगे, संतोष दांडगे, केतन साळवे, पंडित घोरपडे, निलेश साळवे, सय्यद हमीद, कौतीक जोगदंडे, सुशील जोगदंडे, राजू जोगदंडे, दिपक गवळी, राजू गवळी, प्रकाश शेजूळ, प्रवीण पगारे, अमोल लोखंडे, सलमान शाह, गौतम पगारे, मुकेश पगारे, प्रवीण जोगदंडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.