जालना - कोरोनाची तिसरी लाट कधी येईल? कशी येईल माहित नाही, परंतु तिसऱ्या लाटेपूर्वी सर्व बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी बालरोग तज्ज्ञांच्या विशेष पथकांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी बालकांचे लसीकरण बालरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लसीकरण
शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासाठी आज खास आमरसाच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना टोपे म्हणाले की, 18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण करताना बालरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. त्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची तयारी सुरू आहे. बालकांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांची औषोपचार पद्धत वेगळी असते, त्यामुळे त्यांना वेगळे बेड द्यावेत का यावर सध्या चर्चा सुरू आहे. लवकरच बालरोग तज्ज्ञाच्या पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. बालरोग तज्ज्ञांच्या सूचनांप्रमाणे लसीकरण व औषधोपचार करू अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.
हेही वाचा -मेळघाटातील आदिवासी नागरिकांनी कोरोना लसीकरणाकडे फिरवली पाठ