महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वापरलेली पीपीई किट हमरस्त्यावर आढळल्याने भीतीचे वातावरण - Jalna PPE kit news

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून विविध खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र, बदनापूर शहराजवळच जालना-औरंगाबाद मुख्य रस्त्याच्या कडेला एक वापरलेली पीपीई किट टाकून दिलेल्या अवस्थेत दिसून आल्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे.

जालन्यात वापरलेली पीपीई किट रस्त्यावर
जालन्यात वापरलेली पीपीई किट रस्त्यावर

By

Published : Aug 4, 2020, 6:31 PM IST

बदनापूर (जालना) - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून विविध खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र, बदनापूर शहराजवळच जालना-औरंगाबाद मुख्य रस्त्याच्या कडेला एक वापरलेली पीपीई किट टाकून दिलेल्या अवस्थेत दिसून आल्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाबंदी तसेच इतर अनेक उपाययोजना सुरू असून जिल्हयाभरात आपत्ती निवारण कायदा लागू करण्यात आलेला आहे. असे असताना काही गांभीर्य नसलेले लोक समाजात वावरताना दिसून येत आहेत.

बदनापूर येथील जालना- औरंगाबाद हमरस्त्याच्या कडेला दि. ४ ऑगस्ट (मंगळवार) रोजी एक वापरलेली संपूर्ण पीपीई किट, मास्क व इतर साहित्य तसेच रस्त्यावर फेकून दिलेल्या अवस्थेत आढळल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. आज सकाळी ही बाब समोर आली. यामुळे काही लोकांना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये गुरू आहे.

जेथे ही किट पडलेली आढळली, त्याच्या जवळच औद्योगिक वसाहतीत पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीचा व्हॉल्व आहे. त्या व्हॉल्वमधून पाणीगळती नेहमी सुरू असते. कोणी अज्ञात व्यक्तीने या हमरस्त्याने जात असताना सदरील व्हॉल्व दिसल्यानंतर उतरून या ठिकाणी हातपाय धुवून सदरील कीट येथेच फेकून पोबारा केलेला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. वास्तविक पाहता पीपीई किट वापरणारी व्यक्ती ही वैद्यकीयदृष्टया ज्ञानी असते. त्यामुळे वापरलेली पीपीई कीट उघडयावर न टाकता डिस्पोज करावी. असे असतानाही अज्ञाताने केलेल्या या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांत संतापाचे आणि भीतीचे वातावरण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details