महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना नगरपालिकेच्या सहा समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड - Jalna latest news

जालना नगरपालिकेच्या सहा समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड झाली आहे.

नगरपालिकेच्या सहा समित्यांचे सभापतींची
नगरपालिकेच्या सहा समित्यांचे सभापतींची

By

Published : Jan 1, 2021, 10:12 PM IST

जालना -जालना नगरपालिकेच्या सहा समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड झाली आहे. शुक्रवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये विषय समितीच्या सभापतीची निवड करण्यासाठी विशेष सभा बोलविण्यात आली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी कुठलाही विरोध केला नाही.

नवनिर्वाचित सभापती-

नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यानुसार स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष संगीता कैलास गोरंट्याल, या विराजमान झाल्या आहेत. तसेच नगरपालिकेचे उपाध्यक्षपद हे नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सभापती असतात त्यानुसार अन्सारी फरहाना अब्दुल रऊफ यांची निवड झाली आहे. उर्वरित सभापती मध्ये सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी सय्यद फरहीन अजर, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी पुनम राजेश स्वामी यांची पुन्हा एकदा फेरनिवड झाली आहे. स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती पदी हरेश गणेश देवावाले, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी आमिरखान इकबाल अहमदखान, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी रंजना गोपीकिशन गोगडे तर स्थायी समितीच्या सदस्य म्हणून नंदकिशोर गरदास, उषाबाई अशोक पवार, भास्कर दानवे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सानप यांनी जाहीर केले. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्यासह उपमुख्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

नितीन नार्वेकर, मुख्याधिकारी जालना
असे आहे पक्षीय बलाबल-

जालना नगरपालिकेमध्ये राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस 27, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी 9, शिवसेना 10, आणि भारतीय जनता पार्टीत 15, असे पक्षीय बलाबल आहे. मात्र शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी संगनमत केल्यामुळे भाजपाचा टिकाव लागणार नाही, हे ग्राह्य धरून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी कोणताही धोका स्वीकारला नाही. त्यांनी निवडणुकीत भाग घेतला नाही.

हेही वाचा-' राज्याच्या महसुलात चार महिन्यात ३६७ कोटी रुपयांची वाढ'

ABOUT THE AUTHOR

...view details