जालना -शासनाने टाळेबंदी उठविल्यानंतर जिल्ह्यात कसे नियोजन करायचे याचे सर्व अधिकार त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार जालना जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती पाहता सद्यपरिस्थितीत जिल्हा आटोक्यात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सर्व नियम शिथिल करत टाळेबंदी उठविल्याचे जाहीर केले आहे. आज पहिलाच दिवस असताना बाजारामध्ये प्रचंड गर्दी झाली आहे आणि प्रत्येक चौकात वाहतूक विस्कळीत होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच हातगाडीवर फळ आणि भाजीपाला विक्री करणाऱ्यांच्या तोंडाला मास्क नसल्यामुळे भविष्यात याचे परिणाम जालनाकरांना भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जालना जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत किरकोळ दुकानापासून सराफा दुकान, कपड्याची दुकाने, भांड्याचे दुकाने, ही सर्व दुकाने पूर्ववत सुरू झाले आहेत. रस्त्यावर उभ्या असलेल्या हातगाड्या देखील पूर्वीप्रमाणेच गर्दी करू लागले आहेत. विशेष करून रस्त्याच्या मध्यभागी या हातगाड्या लागत असल्यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत आहे. नवीन जालन्यातील सुभाष रोडवर अशा हात गाड्यांची गर्दी मोठी आहे. सावरकर चौकात असलेल्या हातगाडी चालकांच्या तोंडाला तर मास्क सुद्धा नसल्याचे दिसून आले आहे.
प्रशासकीय यंत्रणेचाही दुर्लक्ष