जालना- शहर रेल्वे स्थानकात आज रात्री आठ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मुंबईला जाणाऱ्या एका प्रवाशावर हल्ला केला आहे. हा प्रकार द्वितीय श्रेणी प्रतीक्षालयात घडला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रल्वे स्थानकात काहीवेळ भीतीचे वातावरण पसरले होते. संबंधित प्रवाशाला बाहेर गावी जायचे असल्यामुळे त्याने लोहमार्ग पोलिसांमध्ये लेखी तक्रार दिली.
माहिती देताना प्रवासी किशन कदम व मोहन लाडगे किशन धर्माची कदम असे मारहाण झालेल्या प्रवाशाचे नाव असून ते नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे नोकरी करतात. कदम आपल्या नातेवाईकांसह जालना येथून मुंबईला जाण्यासाठी नंदिग्राम एक्सप्रेसची वाट पाहत. ट्रेन येईपर्यंत ते नातेवाईंकासह द्वितीय श्रेणी प्रतीक्षालयात बसले होते. प्रतीक्षालयातील हॉलमध्ये स्वच्छतागृह आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने कदम यांच्यावर हल्ला केला.
या घटनेची तक्रार देण्यासाठी कदम हे लोहमार्ग पोलिसांकडे गेले. तेथून ते परत प्रतीक्षालयात आले. त्यावेळी सदर अज्ञात व्यक्तीने पुन्हा कदम यांच्यावर हल्ला करत त्यांना लोखंडी वस्तूने मारहाण केली. त्यानंतर, तक्रार का दिली, असे म्हणत खुर्च्यांची तोडफोड करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या हल्ल्यात कदम यांच्या डोक्याला जखम झाली आहे. याप्रकरणी कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून रेल्वे पोलीस आणि लोहमार्ग पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, जालना रेल्वे स्थानकामध्ये जुलै महिन्यात सीसीटीव्ही कॅमेराचे काम सुरू झाले आहे. मात्र, ते अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्याचबरोबर, रेल्वे स्थानकावर अपुरे पोलीस बळ आहे. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यास अपयश येत असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा-प्रदूषण मुक्तीचा संदेश घेऊन ८ जणांचा मुंबई ते कोलकत्ता सायकलवरून प्रवास