बदनापूर (जालना) - शहरातील औरंगाबाद - जालना महामार्गावर असलेल्या एका नवीन तयार होत असलेल्या दुकानाला रात्री अज्ञात व्यक्तींनी आग लावली. शटर वाकवून आत प्रवेश करत लावलेल्या या आगीत दुकानातील फर्निचर, इलेक्ट्रीक फिटिंग व काचा जाळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. एका तरुणाने व्यवसायाच्या हेतूने ही तीन मजली इमारत बांधून कापड दुकान उभारले होते.
कापड दुकानाच्या तीन मजली इमारतीत अज्ञातांनी लावली आग, बदनापुरातील प्रकार - जालना कापड दुकानाच्या इमारतीत आग
या दुकानात मोठ्या प्रमाणात फर्निचरचे काम झालेले होते, तर महागड्या काचा दुकानात लावण्यात आलेल्या होत्या. दरम्यान, १६ जूनच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी खालच्या मजल्याच्या दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला व नासधूस करत आग लावली. या आगीत दुकानातील फर्निचर, इलेक्ट्रिकल फिटिंगसह सर्व काचा जळून खाक झाल्या.
![कापड दुकानाच्या तीन मजली इमारतीत अज्ञातांनी लावली आग, बदनापुरातील प्रकार fire broke out in shop at jalna](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-04:18-mh-jln-01-aag-mhc10039-17062020160044-1706f-1592389844-459.jpg)
सर्व काम होऊन फक्त माल आणणे बाकी होते. लॉकडाऊनमुळे माल भरणा केलेला नव्हता. या दुकानात मोठ्या प्रमाणात फर्निचरचे काम झालेले होते, तर महागड्या काचा दुकानात लावण्यात आलेल्या होत्या. दरम्यान, १६ जूनच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी खालच्या मजल्याच्या दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला व नासधूस करत आग लावली. या आगीत दुकानातील फर्निचर, इलेक्ट्रिकल फिटिंगसह सर्व काचा जळून खाक झाल्या. सदर प्रकार १७ जून रोजी सकाळी उघडकीस आले असता दुकानदार रवी नाईकवाडे यांनी पोलीस निरीक्षक एम.बी.खेडकर यांना माहिती दिली.
माहिती मिळताच एम.बी.खेडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख इब्राहिम, चरणसिंग बमनावत यांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला. या आगीत प्रचंड नुकसान झाले असून महामार्ग रस्त्यावर सदर प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.