जालना -केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एन.डी. पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. संयुक्त महाराष्ट्र, गिरणी कामगार यांच्यासाठी त्यांनी प्रदीर्घ लढा दिला. त्यामुळे, त्यांच्या जाण्याने अवघ्या महाराष्ट्राचे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली.
हेही वाचा -लसीकरणाची वर्षपूर्ती, ९० टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण - आरोग्य मंत्री राजेश टोपे
सरकारचा दबाव आणून नितेश राणेंवर गुन्हे दाखल
आज नितेश राणे ( Raosaheb Danve comment on nitesh rane bail plea ) यांना न्यायालयाने जामीन नाकारला. यावर देखील दानवे यांनी भाष्य केले. न्यायालयावर आमचा विश्वास असून त्यांचा जामीन नाकारला असला तरी, अजून त्यांना अपील करण्यासाठी संधी आहे. सरकारचा दबाव आणून नितेश राणेंवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयाकडून नक्कीच जामीन मिळेल, असा विश्वास दानवे ( Raosaheb Danve comment on nitesh rane ) यांनी व्यक्त केला.