महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'बायोमेट्रिक'च्या कचाट्यात अडकले हंगामी कर्मचाऱ्यांचे मानधन ; राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील प्रकार - रुग्णालयात बायोमेट्रिक प्रणाली

बायोमेट्रीक मशीनवर करण्यात आलेल्या हजेरीमुळे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी निगडीत कर्मचाऱ्यांचे पगार थकित आहेत. यामध्ये काही डॉक्टर तसेच परिचारिका अशा हंगामी पदे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी काही कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक प्रणालीमध्ये हजेरी न नोंदवल्यामुळे त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीत.

बायोमेट्रीक मशीनवर करण्यात आलेल्या हजेरीमुळे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी निगडीत कर्मचाऱयांचे पगार थकित आहेत.

By

Published : Nov 11, 2019, 10:48 PM IST

जालना - बायोमेट्रीक मशीनवर करण्यात आलेल्या हजेरीमुळे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी निगडीत कर्मचाऱ्यांचे पगार थकित आहेत. यामध्ये काही डॉक्टर तसेच परिचारिका अशा हंगामी पदे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी काही कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक प्रणालीमध्ये हजेरी न नोंदवल्यामुळे त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीत. काही कर्मचाऱ्यांनी ज्या दिवशी दोन वेळा थम्ब केलेत, त्याच दिवसाचे मानधन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आहे. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील हंगामी कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक मशीनवर हजेरी नोंदवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, वारंवार सूचना करूनही या कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही कर्मचाऱ्यांनी एकाच वेळेस थम्ब केल्याने त्या दिवसाचे मानधन काढण्यात आलेले नाही. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना महिन्यामध्ये दोन ते तीन दिवसांचेच मानधन मिळाले आहे.

तर काही कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक वर नोंद नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना मानधनापासून वंचित रहावे लागले आहे. सप्टेंबर महिन्यात 482 कर्मचारी हंगामी पदांवर होते. यामध्ये बायोमेट्रिकवर नोंद असलेल्या 415 कर्मचाऱ्यांचे मशीनच्या हजेरीनुसार मानधन काढण्यात आले. यामध्ये ज्यांनी दोन वेळेस थम्ब केले आहेत, आशा कर्मचाऱ्यांचे मानधन निघाले आहे. तर, उर्वरित 67 कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक मशीन नसल्यामुळे ते गैरहजर दाखवण्यात आले आहेत.

असाच प्रकार ऑक्टोबर महिन्यातही घडला आहे. ऑक्टोबरमध्ये 507 कर्मचारी हंगामी पदांवर कार्यरत होते. यापैकी 411 कर्मचाऱ्यांचे दोन्ही वेळेस बायोमेट्रिक हजेरी असलेल्या दिवसांचे मानधन काढण्यात आले आहे. उर्वरित 66 कर्मचारी ऑक्‍टोबरमध्ये देखील बायोमेट्रिक मशीन नसल्यामुळे त्यांची ह जेरी पटावर नोंद नाही यामुळे अशा कर्मचाऱ्यांनी मानधनापासून वंचित राहावे लागले आहे.

या कर्मचाऱ्यांमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा स्त्री व बाल रुग्णालय, यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.
दरम्यान, यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.खतगावकर यांनी या हंगामी कर्मचाऱ्यांकडे याप्रकरणाबाबत खुलासा मागितला आहे. तसेच त्यांच्या मानधनाविषयी काय करता येईल, यासंबंधी आरोग्य सेवा अभियान आयुक्तांकडे मार्गदर्शन मागितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details