जालना- मजुरी करुन घरी परतणाऱ्या दोन मजुरांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. हिसोडा ते जळगाव सपकाळ रस्त्यावर ही घटना घडली आहे. भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील दोन मजुर कामासाठी जळगाव सपकाळ येथे शनिवारी गेले होते. मात्र सायंकाळी काम आटोपून आपल्या मोटर सायकलने घरी परतत असतांना जळगाव सपकाळ ते हिसोडा रस्त्यावर त्यांना भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री सात वाजे दरम्यान घडली आहे. या घटनेत रख्माजी ञ्यबंक पांडे व भानुदास तेजराव कोरडे या दोघांचा मृत्यू झाला आहे.
मजुरी करून घरी परतणाऱ्या दोघांवर काळाचा घाला, वाहनाच्या धडकेत झाला मृत्यू - jalgao sapkal road accident
भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील दोन मजुर कामासाठी जळगाव सपकाळ येथे शनिवारी गेले होते. मात्र सायंकाळी काम आटोपून आपल्या मोटर सायकलने घरी परतत असताना जळगाव सपकाळ ते हिसोडा रस्त्यावर त्यांना भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री सात वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या घटनेत रख्माजी ञ्यबंक पांडे व भानुदास तेजराव कोरडे या दोघांचा मृत्यू झाला आहे.
पोटाची खळगी भरेल इतकीच शेती दोघांकडे होती. मात्र निसर्ग साथ देत नसल्याने शेतीवर घर खर्च भागत नव्हता. त्यामुळे ही दोघंही गेल्या अनेक वर्षांपासून सोबत मिळेल ते काम करत होते. परतु शनिवारी जळगाव सपकाळ येथुन मजुरीचे काम झाल्यावर सायंकाळी घरी जाण्यासाठी निघाले असतानाच त्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. दोन परिवारातील कर्ते गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर रविवारी अकरा वाजेदरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. रख्माजी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली तर भानुदास यांच्या पश्चात एक मुलगा,पत्नी असा परिवार आहे.