महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भोकरदन-जालना महामार्गावर भरधाव कंटेनरने दोघांना चिरडले; एकाचा जागीच मृत्यू

भोकरदनमधील बांधकाम ठेकेदाराकडे कामाला असलेले हे दोघेही तरुण आपल्या बजाज डिस्कव्हर (एमएच-२१-एए-७२२४)  नेहमीप्रमाणे  बांधकाम साईडवर निघाले होते. यातील शेख नदीम शेख अहमद (वय २५) हा गाडी चालवत होता. जालना रस्त्यावरील चिंचोली फाट्याजवळ अचानक समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने (एआर-७३- ७५०२) जोरदार धडक दिल्याने नदीम हा जागीच ठार झाला.

jalna
भोकरदन-जालना महामार्गावर भरधाव कंटेनरने दोघा कामगारांना चिरडले; एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

By

Published : Dec 11, 2019, 8:25 PM IST


जालना :भोकरदन-जालना महामार्गावरील चिंचोली फाट्याजवळ बुधवारी सकाळी दुचाकीला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी असल्याने तातडीने त्याला जालन्याच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे.

हेही वाचा -भरदिवसा झालेल्या लुटमारीमुळे व्यापारी भयभीत, नवीन मोंढा भागात पोलीस चौकीची मागणी

भोकरदनमधील बांधकाम ठेकेदाराकडे कामाला असलेले हे दोघेही तरुण आपल्या बजाज डिस्कव्हर (एमएच-२१-एए-७२२४) नेहमीप्रमाणे बांधकाम साईडवर निघाले होते. यातील शेख नदीम शेख अहमद (वय २५) हा गाडी चालवत होता. जालना रस्त्यावरील चिंचोली फाट्याजवळ अचानक समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने (एआर-७३- ७५०२) जोरदार धडक दिल्याने नदीम हा जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेला मित्र शेख अरबाज (वय १६) हा गंभीर जखमी झाल्याने त्याला जालना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले.

हेही वाचा -'सुपारी' प्रकरणातून वाचलेल्या उद्योगपतीने कथन केली 'आपबिती'

या घटनेची भोकरदन पोलिसांना माहिती मिळताच एपीआय बी.बी वडदे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि जखमी झालेल्या अरबाज आणि नदीमला पुढील कार्यवाहीसाठी रवाना केले. धडक देऊन पसार झालेल्या कंटेनरच्या चालकाला नागरिकांनी पाठलाग करून राजूर पोलिसांत दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details