जालना - बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण शिवारातून दोन ठिकाणाहून वाळूचे साठे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थित पोलिसांनी जप्त केले. यामधून २ हजार २७४ ब्रास वाळूसह ६८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जालन्यात २ हजार २७४ ब्रास वाळूसह ६८ लाखांचा मुद्देमाल जप्त
जालन्यात अवैध वाळूसाठे जप्त करण्यात आले असून, २ हजार २७४ ब्रास अवैध वाळू असे मिळून ६८ लाख २२ हजार रुपयाचा ऐवज जप्त केला. बदनापूरचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सानप यांच्या फिर्यादीवरून अमोल केशवराव मदन,व्यंकट मदन यांच्याविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून, स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आज (सोमवार) शिवारातील अमोल केशवराव मदन व केशवराव व्यंकट मदन या दोघांनी चोरटी वाहतूक विक्री करण्याच्या हेतूने वाळूचा अवैध साठा करून ठेवला होता.ही माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावले. त्यांनी केलेल्या मापानुसार १ हजार ६७४ ब्रास वाळूसह जवळवास ५० लाख रुपये आहे. याच शिवारातील राजेवाडी साठवण तलावात जमिनीवर आणखी एक वाळूसाठा सापडला. हा साठादेखील वरील दोघांचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. या साठ्यामध्ये ६०० ब्रास वाळू आहे. याची किंमत१८ लाख रुपये आहे.
दोन्ही वाळूसाठे मिळून २ हजार २७४ ब्रास अवैध वाळू असे मिळून ६८ लाख २२ हजार रुपयाचा ऐवज जप्त केला. बदनापूरचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सानप यांच्या फिर्यादीवरून अमोल केशवराव मदन,व्यंकट मदन यांच्याविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कामगिरी करण्यासाठी शामुवेल कांबळे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, गोकुळसिंग कायटे यांच्यासह मंडल अधिकारी यु.पी. कुलकर्णी, के. के. ढाकणे यांनी सहभाग नोंदविला.