जालना - अंबड तालुक्यातील दूधपुरी गावात शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज (29 डिसेंबर) सकाळी ही घटना उघडकीस आली. सिद्धेश्वर रामकिसन धांडे (वय 16) आणि शुभम कल्याण पाटोळे (वय 14), अशी मृत मुलांची नावे आहेत.
दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; अंबड तालुक्यातील घटना - शेततळ्यात बुडून मृत्यू दूध पुरी
सकाळी सिद्धेश्वर धांडे आणि शुभम पाटोळेचा मृतदेह दूधपुरी गावाच्या शिवारात असलेल्या एका शेततळ्यात आढळून आला. ही घटना नेमकी केव्हा आणि कशी घडली, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
![दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; अंबड तालुक्यातील घटना child](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5528153-thumbnail-3x2-child.jpg)
मृत सिद्धेश्वर धांडे आणि शुभम पाटोळे
दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
हेही वाचा -नाशकातील दुगारवाडी धबधब्यात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
आज सकाळी सिद्धेश्वर आणि शुभमचा मृतदेह दूधपुरी गावाच्या शिवारात असलेल्या एका शेततळ्यात आढळून आला. सिद्धेश्वर दहाव्या तर शुभम आठव्या वर्गात शिकत होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, ही घटना नेमकी केव्हा आणि कशी घडली, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Last Updated : Dec 29, 2019, 4:38 PM IST