जालना -दिल्ली येथील निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातीचा मरकज हा धार्मिक कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या जालन्यातील येथे दोन व्यक्तींना सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.
डॉक्टरांनी या दोन्ही व्यक्तींना पुढील 14 दिवस क्वॉरेन्टाईन राहण्यासाठी सांगितले असून त्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये जुना जालना बाजार चौकी परिसरातील एक आणि मंठा चौफुली परिसरातील एकाचा समावेश आहे.