जालना- भोकरदन बसस्थानकात रात्री नऊ वाजताच्या सुमारास दोन मनोरुग्ण फिरत असल्याचे तेथील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर नागरिकांनी सामाजिक बांधिकली जपत त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे.
सामाजिक बांधिलकी... दोन बेपत्ता व्यक्तींना नागरिकांनी केले नातेवाईकांच्या स्वाधीन - 2 persons missing in bhokardan
भोकरदन बसस्थानकात रात्री नऊ वाजेच्या दरम्यान दोन वेगवेगळे मनोरुग्ण फिरत असल्याचे तेथील नागरिकांच्या निदर्शनाश आले. त्यानंतर नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांना नातेवाईकांकडे स्वाधीन करण्यात आले आहे.
दरम्यान, या बेपत्ता व्यक्तींकडे कोणीही विचारपूस करत नव्हते. दरम्यान, जाफराबाद येथील वकील संदीप बरोदे हे त्याच ठिकाणी कामानिमित्त आले असता, तेथील नागरिकांनी हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी भोकरदन पोलिसात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल गणेश निकम यांच्या मदतीने विचारपूस केली. त्यावेळी दोन्ही योग्यरित्या पत्ता देत नव्हते. त्यानंतर पत्रकार रितेश देशपांडे आणि सुरेश गिराम यांना याबद्दल विचारपूस करत महिती घेतली. त्यावेळी त्यातील एक व्यक्ती जालन्यामधून बेपत्ता असल्याचे समोर आले. गोपाल गजानन ताठे (वय 15) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो भोळसर आहे. त्यानंतर त्यांच्या वडिलांना याबद्दल माहिती कळताच ते भोकरदन येथ आले. तर, अकोल्याच्या 45 वर्षीय महिला ताहेरा बी सय्यद अलहुद्दीन या जवळपास पंधरा दिवसांपासून अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामधून बेपत्ता होत्या. याची मिसिंग तक्रार अकोला येथे दाखल केली होती. याची माहिती नातेवाईकांना देताच अलहुद्दीन सय्यद हे भोकरदन येथे आले.
दरम्यान, नातेवाईक आल्यानंतर त्या व्यक्तींची ओळख पटवून दिली. हे दोघेही घरात न सांगता बसने भोकरदन बसस्थानकात पोहोचले होते. यावेळी अॅड.संदीप बरोडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश निकम, पत्रकार रितेश देशपांडे, पत्रकार सुरेश गिराम, शहरातील नागरिक अक्रम मणियार, जावेद अस्लम मणियार या नागरिकांनी मदत केली होती. त्यानंतर त्या दोन्ही व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी दोघांच्याही कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानले.