जालना (बदनापूर)- जालना-औरंगाबाद हायवेवर विनोदराय कंपनीसमोर विचित्र अपघात झाला. रस्ता ओलांडणाऱ्या एका जणास कारने उडवल्याने तो जागीच ठार झाला. तर या कारमध्ये प्रवास करणारा एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे.
जालना औरंगाबाद महामार्गावर विनोदराय कारखान्यासमोर एक ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे त्या ट्रकचा क्लिनर जॅक घेऊन महामार्ग ओलांडत असतानाच दुसऱ्या बाजूने एक कार आली. या कारला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याने जॅक नेणाऱ्या व्यक्तीस उडवले. त्यात तो ठार झाला तर त्यानंतर कारही उलटली या अपघातात कारमधील एक जण ठार झाला.
हेही वाचा-चकमक करणाऱ्या दहशतवाद्याला शरण येण्याचे सैनिकाकडून आवाहन, नंतर असे घडले नाट्य...