महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Police Firing : जालन्यात दोन गटात राडा, पोलिसाचा हवेत गोळीबार; हाणामारीत तीन जण गंभीर जखमी - Police Firing

जालन्यातील नागेवाडी शिवारात दोन गटात तीक्ष्ण हत्याराने तुंबळ ( Fighting with a sharp weapon ) हाणामारी सुरू असताना ही हाणामारी सोडवण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने गोळीबार ( Police firing in the air ) केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतले असून दोन गटातील वादाचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Police Firing
पोलीसाचा हवेत गोळीबार

By

Published : Jul 22, 2022, 11:07 PM IST

जालना -नागेवाडी शिवारात दोन गटात तुंबळ हाणामारी ( fight broke two groups ) झाली आहे. यावेळी दोन गटातील वाद मिटवण्यासाठी बदनापूर पोलिस ठाण्याच्या एपीआय कडून हवेत गोळीबार ( Police firing in the air ) करण्यात आला आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतले ( Police detained 7 people ) असून दोन गटातील वादाचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पोलीसाचा हवेत गोळीबार
हवेत गोळीबार -जालन्यातील नागेवाडी शिवारात दोन गटात तीक्ष्ण हत्याराने तुंबळ हाणामारी ( Fighting with a sharp weapon ) सुरू असताना ही हाणामारी सोडवण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने गोळीबार केला आहे. एपीआय साईनाथ रामोड असं गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आहे. संध्याकाळच्या सुमारास जालना पोलिस अधीक्षक कार्यालयातून मिटिंग संपल्या नंतर बदनापूर पोलिस ठाण्याचे एपीआय रामोड हे बदनापूरकडे जात असताना नागेवाडी शिवारात दोन गटात तुफान हाणामारी सुरू होती. रामोड यांनी दोन्ही गटाचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही गटाकडून एकमेकांवर तीक्ष्ण हत्याराने वार करण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याने एपीआय रामोड यांनी दोन्ही गटाला शांत करण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

हेही वाचा -Sunil Shetty in High Court : दोष मुक्त करण्याच्या मागणीसाठी अभिनेता सुनील शेट्टी उच्चन्यायालयात

7 जण ताब्यात -या तुंबळ हाणामारीत दोन्ही गटातील ४ ते ५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ृ दाखल झाला असून बदनापूर आणि चंदनझिरा पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन गटात झालेल्या हाणामारीचं कारण समोर आलं नसलं तरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या हाणामारीच्या घटनेतील जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी हाणामारी प्रकरणी 7 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा -Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना 5 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details