जालना- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणत आलेला जालना जिल्हा आता हळूहळू कोरोनाबाधित होण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर सोमवारी पुन्हा दोन रुग्ण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.जालनामध्ये एकूण कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 13 झाली आहे.
जालन्यात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याने संख्या पोहोचली 13 वर - एक पोलीस कोरोनाबाधित
जालना जिल्ह्यात सुरुवातीच्या काळाच कोरोनाबाधित रुग्ण आढळले नव्हते. मात्र, हळूहळू कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही चिंताजनक बाब आहे.
जालना कोव्हिड रुग्णालय
एक परिचारिका आणि राज्य राखीव पोलीस दलाचा जवान यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तो जवान मालेगाव येथून बंदोबस्तावरुन परतलेला होता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आहे.
रविवारी अंबड तालुक्यात दोन तर जालना तालुक्यात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. जालना जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. ही बाब जिल्हाासियांच्या चिंतेत भर टाकणारी आहे.