महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना: बावीस वर्षानंतर विद्यार्थ्यांना आठवला शिक्षकांचा मार; जुन्या आठवणींनाही दिला उजाळा - jalna ex student news

श्री महावीर स्थानकवासी जैन विद्यालयाच्या 1998 या वर्षी दहावी पास झालेल्या वर्गमित्रांनी आज एकत्र येऊन शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

twenty two years later students remembered the  memories of school in jalna
जालना: बावीस वर्षानंतर विद्यार्थ्यांना आठवला शिक्षकांचा मार; जुन्या आठवणींनाही दिला उजाळा

By

Published : Nov 19, 2020, 2:55 AM IST

जालना-सुमारे २२ वर्षांपुर्वी एकाच वर्गात शिकणाऱ्या 60 विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षण घेत असताना शिक्षकांनी केलेल्या संस्कारांमुळेच आम्ही आज यशस्वी होऊ शकलो, अशी भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
बावीस वर्षांपूर्वीच्या आठवणी केल्या ताज्या-
जालना येथील श्री महावीर स्थानकवासी जैन विद्यालयाच्या 1998 या वर्षी दहावी पास झालेल्या वर्गमित्रांनी आज एकत्र येऊन शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांना घडवणारे अनेक शिक्षक मात्र या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. शाळेतून बाहेर पडल्यानंतर हे सर्व विद्यार्थी आज विविध ठिकाणी नोकरीला आहेत. तसेच काही जण व्यवसायिक आहेत. या सर्वांनी एकत्र येत आज आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शाळेचे मुख्यध्यापक यांच्यासह इतर निवृत्त शिक्षकही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या या स्नेहमिलनाचा कार्यक्रम बघून भरून आल्याची भावना या शिक्षकांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांसह सद्या शिकत असलेले इतर विद्यार्थीही उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details