महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना : पाच तोळे सोन्यासह वीस हजारांची रोकड लंपास - जालना पत्रकाराच्या घरी चोरी

जालना शहरातील महेशनगर परिसरात घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 20 हजार रुपयांची रोकड लंपास केली. रविंद्र बांगड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी अस्ताव्यस्त केलेले सामान

By

Published : Oct 23, 2019, 11:49 AM IST

जालना - शहरातील महेशनगर परिसरात घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 20 हजार रुपयांची रोकड लंपास केली. पत्रकार रविंद्र मिश्रीलाल बांगड यांच्या घरात ही चोरी झाली.

हेही वाचा - मराठवाडा विभाग : मतदार राजा कोणासोबत?


मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बांगड यांच्या बेडरुमच्या दरवाजाची कडी व कोंडा तोडली. तेथील कपाटातून पाच तोळे सोने व रोख वीस हजार रुपये लंपास केले. रविंद्र बांगड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक यासिन खान हसन खान पठाण हे पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details