जालना- महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभागात जालना जिल्ह्यातून पंचवीस हजार पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी केली आहे. मे-जूनमध्ये या निवडणुका होणार आहेत.
मतदारसंघाच्या नाव नोंदणीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये जालना तालुक्यातील 7960, बदनापूरमधील 2035, भोकरदनमधील 3590, जाफराबादमधील 2317, परतुरमधील 2216, मंठ्यातील 1694, अंबडमधील 3416 आणि घनसावंगीमधील 2047 अशा एकूण 25005 पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी केली आहे. या नाव नोंदणी संदर्भातील प्रारूप मतदार यादी 23 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 9 डिसेंबरपर्यंत या यादीवर दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. अंतिम यादी 30 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.