महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंबड चौफुली ते मंठा चौफुली रस्त्यावर विटा ने भरलेला ट्रक उलटला - truck full of bricks crashed

अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यान वळण रस्त्यावर विटांनी भरलेल्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

truck full of bricks overturned on the road from Ambad Chowfuli to Mantha Chowfuli
अंबड चौफुली ते मंठा चौफुली रस्त्यावर विटा ने भरलेला ट्रक उलटला

By

Published : Feb 3, 2021, 7:01 PM IST

जालना -अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यान वळण रस्त्यावर विटांनी भरलेला ट्रक उलटला. ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. मात्र, या अपघातात जीवित हानी झालेली नाही.

अंबड चौफुली ते मंठा चौफुली रस्त्यावर विटा ने भरलेला ट्रक उलटला

ट्रकमध्ये होत्या 8 हजार विटा -

अंबड चौफुली माडून मंठा चौफुली कडे जाताना संजीवनी रुग्णालया जवळ ट्रक रस्त्याच्या दुभाजकावर चढला आणि उलटला. या अपघातात रस्त्यावरच्या पथदिव्याचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेला पथ दिवा सुरू नसल्याने नागरिकांनी लंपास केले. दरम्यान या ट्रकमध्ये 8 हजार विटा भरलेल्या असल्याची माहिती मिळत आहे.

जीवितहानी नाही -

ट्रकची परिस्थिती पाहता लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, यामध्ये कसल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. ट्रकचे एक्सल, समोरचे पाटे, स्टेरिंग रॉड हे सर्व भाग तूटलेले आहेत. रस्त्यावर पडलेल्या या विटामुळे वाहतुकीला थोडा अडथळा निर्माण झाला आहे. मात्र, दुपारनंतर या विटा दुसऱ्या ट्रकमध्ये भरण्याचे काम सुरू झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details