जालना - शहरातील कन्हैयानगर भागामध्ये ट्रकच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सकाळी साडेनऊ वाजता घडली. त्यानंतर परिसरातील जमावाने या ट्रकच्या काचा फोडून चालकाला मारहाण केली. त्यासोबत मोठ्या प्रमाणात जमावाने रस्त्यावर उतरून रास्ता रोकोही केला. सय्यद मतीन सय्यद अखिल (वय २० रा. कन्हैयानगर) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; जमावाची चालकाला मारहाण - mob beten truck driver jalana
शहरातील कन्हैयानगर भागामध्ये ट्रकच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर परिसरातील जमावाने या ट्रकच्या काचा फोडून चालकाला मारहाण केली. त्यानंतर जमावाने रस्त्यावर उतरून रास्ता रोकोही केला.
ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
दरम्यान, घटनास्थळावर पोलीस आणि राखीव दलाचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासोबत चंदंजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम सुंदर कोठावळे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय देशमुख, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, शहर वाहतूक शाखेचे छत्रभूज काकडे घटनास्थळावर उपस्थित आहेत.
Last Updated : Feb 19, 2020, 2:56 PM IST