भोकरदन (जालना) - भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये २० भारतीय जवानांना वीरमरण आले. या जवानांना जालन्यातील युवक काँग्रेसतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी चीन सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तर 'वीर जवान अमर रहे'च्या घोषणा देण्यात आल्या.
सरकारने याविषयी ठोस निर्णय घेतल्यास आम्ही सरकारसोबत आहोत, असे युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राहुल देशमुख यांनी सांगितले. मात्र, सरकार ज्या पद्धतीने सत्य परिस्थिती लपवत आहे ते निंदनीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्काळ याबद्दल खुलासा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच खंबीर निर्णय घेण्याची क्षमता नसल्यास पंतप्रधानांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा -ओडिशातील जगन्नाथ पुरी येथील वार्षिक रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
यावेळी नगरसेवक रमेश जाधव, रोशन देशमुख, वसीम शेख, सोपान सपकाळ, प्रकाश देशमुख, महेश दसपुते, रफिक कादरी, सद्दाम मिर्झा, शेख जावेद आदींची उपस्थिती होती.