महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नराधमांना आमच्या ताब्यात द्या; जालन्यात तृतीयपंथींचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या गुंडांना शिक्षा झाली नाही तर अशा प्रवृत्ती वाढत जातील आणि महिलांना घराबाहेर पडणेही अवघड होईल. प्रशासनाकडून कोही होत नसेल तर या नराधमांना आमच्या ताब्यात द्या. आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना शिक्षा देऊ, असे या निवेदनात म्हटले आहे.

jalna
जालन्यात तृतीयपंथींचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

By

Published : Nov 30, 2019, 7:10 PM IST

Updated : Dec 1, 2019, 1:28 PM IST

जालना - हैदराबाद येथे महिला डॉक्टर हिच्यावर झालेल्या सामूहिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी जालन्यातील तृतीयपंथीयांनी लावून धरली आहे. अखिल भारतीय सेनेच्या नेतृत्वाखाली तृतीयपंथीयांनी या घटनेचा निषेध नोंदवत जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही दिले आहे.

जालन्यात तृतीयपंथींचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

हेही वाचा -एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्या; जालन्यात शिवसेनेची मागणी

ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या गुंडांना शिक्षा झाली नाही तर अशा प्रवृत्ती वाढत जातील आणि महिलांना घराबाहेर पडणेही अवघड होईल. प्रशासनाकडून काही होत नसेल तर या नराधमांना आमच्या ताब्यात द्या. आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने शिक्षा देऊ, असे या निवेदनात म्हटले आहे. अखिल भारतीय सेनेच्या जालना शहराध्यक्ष नंदा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी अनिता शेख, सिमरन शेख, सोनाली शेख, अक्षरा शेख, स्वाती शेख यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्या शेख लतिफा, लक्ष्मी जाधव, सरोज गायकवाड आदी उपस्थित होत्या.

Last Updated : Dec 1, 2019, 1:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details