जालना- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2019- 20 मध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भरताना अडचण येऊ नये तसेच कंपनी आणि शेतकऱ्यांमधील पुढील वाद टाळले जावेत, यासाठी पिक विमा कंपनीच्या वतीने सीएससी चालकांना आज पिक विमा अर्ज भरून घेण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.
मागील वर्षाच्या पीक विम्याचे पैसे अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी आणि पीक विमा कंपनी यांच्यामधील वाद वाढतच जात आहे. ही चूक पुन्हा या वर्षी होऊ नये. म्हणून खरीप हंगामाचा पिक विमा भरून घेणारी बजाज अलियांस या कंपनीच्या वतीने आज ज्या केंद्रांवर पिक विमा भरला जाणार आहे, अशा सुमारे एक हजार सीएससी केंद्र चालकांना प्रशिक्षण देण्यात आले.
शेतकर्यांनी घ्यावयाची काळजी
- शेतकऱ्यांनी एकाच जमिनीच्या क्षेत्रफळावर दोन ठिकाणी पिक विमा भरू नये, भरल्यास दोन्ही ठिकाणचे अर्ज बाद होऊ शकतात.
- जमिनीत जे पीक आहे त्याच पिकाचा विमा भरावा अन्यथा तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही .
- पिक पेरा यावर तलाठीच्या सहीची आवश्यकता नाही, स्वतःची सही करावी.