जालना -शहर वाहतूक फक्त नावापुरतीच राहिली असून शहरातील वाहतुकीचे बारा वाजले आहेत. वाहतूक शाखेतर्फे वसुली मात्र जोरात सुरू आहे.
शहरातील मामा चौकात अस्ताव्यस्त उभे असलेले रिक्षा, भाजी-फळवाल्यांचे गाडे यामुळे महिलाही त्रस्त झाल्या आहेत. विक्षिप्त हावभाव करून हे हातगाडीवाले महिलांचा मानसिक छळ करतात. शहर वाहतूक पोलिसांसाठी असलेल्या निवाऱ्यांमध्ये दुसरीच दुकाने थाटली गेली आहेत.रस्त्यावर मध्यभागी उभी असलेली जनवारे आणि त्यामुळे होत असलेल्या अपघातांकडे वाहतूक पोलीस सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. यामुळे या शहर वाहतूक शाखेविषयी नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.