जालना -नवीन मोंढा भागात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. चोरी आणि लुटमारीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी या भागामध्ये नवीन पोलीस चौकी उभारावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
व्यापाऱ्यांकडून जालन्यातील नवीन मोंढा भागात पोलीस चौकीची मागणी... हेही वाचा... चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, 9 दिवस फ्रीजमध्ये ठेवला मृतदेहाचा अर्धा भाग
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये असलेल्या नवीन मोंढा भागामध्ये रोज करोडो रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे येथे बुलढाणा अर्बन बँक, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चिखली अर्बन को-ऑपरेटिव बँक, जालना मर्चंट बँक, अशा अनेक बँका आहेत. त्यामुळे शहराबाहेर असलेल्या बँकेमधून शहरातील मुख्य शाखेमध्ये नेहमीच पैशाची आवक-जावक चालू असते. त्या सोबत व्यापारी देखील रात्री व्यवसाय बंद केल्यानंतर लाखो रुपयांची रक्कम घरी घेऊन येतात. त्यामुळे या परिसरात पोलीस चौकी उभारावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
हेही वाचा... सीआरपीएफ जवानांनी एकमेकांवरच झाडल्या गोळ्या; दोघांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती
सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नवीन मोंढ्यामध्ये बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अडवून तीन लाख रुपयांची रोकड पळवून नेली. या प्रकरणामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच मोंढ्यामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. अशाच प्रकरणात 1 वर्षापूर्वी 50 लाख रुपयांच्या सिगारेटचे बॉक्स चोरीला गेले होते. मात्र, अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी या भागांमध्ये पोलीस चौकी उभारावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.