जालना -सामान्य रुग्णालयामध्ये कोविडचा तपासणी अहवाल देण्यासाठी दोन-दोन दिवस लागत होते .एवढेच नव्हे तर पॉझिटिव्ह असलेला रुग्णाला देखील अहवाल देण्यासाठी तीन तास घालावे लागत होते. या संदर्भातील बातमी ईटीव्हीने दिनांक 22 रोजी प्रकाशित केली होती. याचा परिणाम म्हणून आता कोविडचा अहवाल देण्यासाठी तीन खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत.
ईटीव्ही इम्पॅक्ट; अखेर कोविड अहवाल देण्यासाठी रुग्णालयाने सुरू केल्या तीन खिडक्या
एका खिडकीतून देण्यात येणारे अहवाल आता तीन वेगवेगळ्या खिडक्यांमधून दिले जात आहेत. त्यामध्ये पॉझिटिव रुग्णांसाठी एक, निगेटिव्ह रुग्णांसाठी एक, आणि अहवालांच्या चौकशीसाठी एक, अशा तीन स्वतंत्र खिडक्या सुरू केल्या आहेत.
कोरोना बाधित महिला इतर लोकांच्या संपर्कात
19 तारखेला केलेल्या रुग्णांचे अहवाल 22 तारीख उजाडली तरी मिळाले नव्हते. हे अहवाल घेण्यासाठी रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना ३ तास रांगेत उभे रहावे लागत होते. covid-19 त्या प्रयोगशाळेतच हे अहवाल दिला जात होते. रुग्ण पॉझिटिव्ह असो अथवा नसो एकाच लाईनमध्ये उभे राहावे लागायचे. याच वेळी दिनांक 22 रोजी एक कोविड पॉझिटिव महिला तीन तासांपासून अहवालासाठी येथे चकरा मारत होत्या . मात्र तिच्याकडे कोणाचेही लक्ष दिले नव्हते. पॉझिटिव्ह असलेली ही महिला अन्य रुग्णांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. या सर्व प्रकाराचे चित्रीकरण ईटिव्ही भारतने करून बातमी प्रकाशित केली होती. हे वास्तवदर्शी चित्र पाहिल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आणि लगेचच याच परिसरात कोरोनाचा अहवाल देण्यासाठी तीन वेगवेगळ्या खिडक्या सुरू केले आहेत.
तीन वेगवेगळ्या खिडक्यांमधून अहवाल
एका खिडकीतून देण्यात येणारे अहवाल आता तीन वेगवेगळ्या खिडक्यांमधून दिले जात आहेत. त्यामध्ये पॉझिटिव रुग्णांसाठी एक, निगेटिव्ह रुग्णांसाठी एक, आणि अहवालांच्या चौकशीसाठी एक, अशा तीन स्वतंत्र खिडक्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे कोविंड रुग्णांचा अहवाल घेण्यासाठी येणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच अहवाल घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना उन्हात उभे न करता सावलीची व्यवस्था करावी. अशी अपेक्षा रुग्णांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे.