महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोविड -१९ ची लस दोनवेळा घेऊनही तीन वरिष्ठ सरकारी डॉक्टर कोरोनाबाधित - जालन्यात कोरोना लस घेऊनही तीन डॉक्टर बाधित

दुसऱ्या टप्प्यामध्ये कोरोनाने जालना जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढले आहे. कोविड-19 ची लस दोनवेळा घेऊनही याचा परिणाम होताना दिसत नाही. ज्या सरकारी डॉक्टरांनी दोन वेळा ही लस घेतली आहे तेच डॉक्टर कोरोनाबाधित झाल्यामुळे जालनेकरांसाठी "दुष्काळात तेरावा महिना" सुरू झाला आहे.

senior government doctors have been corona infected with Covid-19
senior government doctors have been corona infected with Covid-19

By

Published : Mar 12, 2021, 7:49 PM IST

Updated : Mar 12, 2021, 8:04 PM IST

जालना - दुसऱ्या टप्प्यामध्ये कोरोनाने जालना जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढले आहे. कोविड-19 ची लस दोनवेळा घेऊनही याचा परिणाम होताना दिसत नाही. ज्या सरकारी डॉक्टरांनी दोन वेळा ही लस घेतली आहे तेच डॉक्टर कोरोनाबाधित झाल्यामुळे जालनेकरांसाठी "दुष्काळात तेरावा महिना" सुरू झाला आहे.

कोरोना होणार नाही असे नाही -

कोविड-19 ची लस आल्यानंतर आरोग्य विभाग आणि सामान्य नागरिकांचा असा समज झाला होता की, ही लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही. हा समज गैरसमज ठरला आहे. सुरुवातीला आरोग्य विभागात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली आणि त्यानंतर टप्प्या-टप्प्याने दुसऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी होते. त्या अधिकाऱ्यांनी दोन्ही डोस घेतल्यानंतर देखील कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अर्चना भोसले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .विवेक खतगावकर आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले यांचा समावेश आहे. त्यामुळे लस घेऊनही जर कोरोना होत असेल तर या लसीचा उपयोग काय? असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडला आहे. दरम्यान लस घेतल्यामुळे कोरोना होणार नाही असे नाही, तर त्याची तीव्रता कमी होईल आणि घडणारी दुर्घटना घडणार नाही, असा दिलासा सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पद्मजा सराफ यांनी दिला आहे.

जालन्यात कोरोना लस घेऊनही कोरोनाची बाधा
हे ही वाचा -विद्यार्थ्यांचे प्रकरण हाताळण्यात राज्य लोकसेवा आयोग अपयशी -अजित पवार
आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार -
गर्दी टाळण्यासाठी आरोग्य विभाग टाहो फोडून ओरडून सांगत आहे. परंतु जनता तरी काय करणार ? ज्यांच्यासाठी हे लसीकरण आहे अशा 45 वर्षीय व्यक्तींना आणि इतर आजाराची लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. मात्र एवढी मोठी यंत्रणा असूनही लसीकरणासाठी आलेल्या वयोवृद्ध गरजूंसाठी उन्हामध्ये तंबू ठोकला आहे आणि हळूहळू दुपारच्या वेळेला या तंबूमध्ये ऊन आल्यानंतर हे सर्वच वयोवृद्ध निवाऱ्यासाठी एकत्र येत आहेत. एक ते दोन तास ही लस घेण्यासाठी लागत आहेत. येणाऱ्या गरजूंना निवाराच नसेल तर याला जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्न देखील इथे आलेले गरजू उपस्थित करीत आहेत.
प्रशासन हतबल -शहरांमध्ये गर्दीला आळा घालण्यासाठी आणि मास्क शिवाय फिरणाऱ्या नागरिकांना दंड करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने दहा पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके म्हणजे "असून अडचण नसून खोळंबा" अशी परिस्थिती आहे. मास्क शिवाय पकडलेले नागरिक वशिला लावून सुटुन कसे जाता येईल याच्यावर भर देत आहेत. त्यामुळे विनाकारण वाद नको म्हणून या पथकातील कर्मचारीदेखील अशा नागरिकांना सोडून देताना दिसत आहेत.
Last Updated : Mar 12, 2021, 8:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details