महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वरुडी चेकपोस्टवर पेंडॉलमध्ये घुसली चारचाकी, तीन पोलीस जखमी

कोरोना काळात सुरू असलेली नाकाबंदी व विनापास प्रवास करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी औरंगाबाद-जालना सिमेवर असलेल्या वरुडी येथे पोलीस चेकपोस्टची निर्मिती करण्यात आली आहे. याठिकाणी पोलिसांच्या सोईसाठी तात्पुरत्या स्वरुपात पेंडॉलची देखील निर्मिती करण्यात आली आहे. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने या पेंडॉलमध्ये चारचाकी घुसल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

चेकपोस्टवर पेंडॉलमध्ये घुसली चारचाकी
चेकपोस्टवर पेंडॉलमध्ये घुसली चारचाकी

By

Published : May 22, 2021, 3:57 PM IST

बदनापूर (जालना) -कोरोना काळात सुरू असलेली नाकाबंदी व विनापास प्रवास करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी औरंगाबाद-जालना सिमेवर असलेल्या वरुडी येथे पोलीस चेकपोस्टची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांच्या सोईसाठी तात्पुरत्या स्वरुपात पेंडॉलची देखील निर्मिती करण्यात आली आहे. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने या पेंडॉलमध्ये चारचाकी घुसल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, आरोग्य कर्मचारी थोडक्यात बचावले आहेत.

प्रशासनाकडून ब्रेक द चेन या उपक्रमांतर्गत निर्बंध लागू केल्यानंतर, औरंगाबाद व जालना जिल्ह्याची सीमा असलेल्या वरुडी फाट्याजवळ पोलीस चेक पोस्ट सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी वाहने थांबवून पोलीस येणाऱ्या जाणाऱ्यांकडे इ-पास आहे किंवा नाही याची तपासणी करतात. आज सकाळी पोलीस कर्मचारी या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना, औरंगाबादकडून जालन्याकडे जाणारी चार चाकी (क्रमांक एमएच 42 एएक्स 1687) ही पेंडॉलमध्ये घुसली. चालकाचे वाहनावरील नियंंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

अपघातात तीन पोलीस जखमी

या अपघातामध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, तर आरोग्य कर्मचारी थोडक्यात बचावले. गजानन जारवाल, चंद्रकांत लोखंडे व अमोल रगडे असे या जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर आरोग्य कर्मचारी के. व्ही. मोरे हे थोडक्यात बचावले आहेत. जखमींना तात्काळ येथीलच अलनूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर गजानन जारवाल यांचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जालन्याला पाठवण्यात आले आहे. दरम्यान अपघात घडल्यानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

हेही वाचा -सेवाव्रती! गरोदर असतानाही महिला पोलीस कर्तव्यासाठी ऑन ड्युटी!

ABOUT THE AUTHOR

...view details