जालना - लग्न कार्यासाठी माळी पिंपळगाव येथे दुचाकीवरून जात असलेल्या तिघांना पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सांयकाळी सहाच्या सुमारास अंबड वडीगोद्री रस्त्यावरील झिर्पी पाटीजवळील महादेव मंदिरासमोर घडली. ज्ञानेश्वर ऋषींदर एखंडे (उपसरपंच), सुरेश रावसाहेब एखंडे, नारायण दत्तु एखंडे ( तिघे रा. बदापूर, ता. अंबड) असे मृत व्यक्तींची नावे आहेत.
अंबडजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात; तीन जण जागीच ठार
या अपघाताची माहिती अंबड पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक शैलेश शेजुळ, जमादार के. बी. दाभाडे, साळवे, गोतीस, जाधव आदींनी धाव घेऊन पंचानामा केला. तिघांनाही शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये अंबड येथे दाखल करण्यात आले.
अंबड तालुक्यातील बदापूर येथील उपसरंपच ज्ञानेश्वर एखंडे हे वरील दोघांसह विना नंबरच्या टीव्हीएस कंपनीची स्टार सिटी या मोटारसायकलवरून गावातील मुलाच्या लग्नाला माळी पिंपळगाव येथे जात होते. अंबड-वडीगोद्री रस्त्यावर झिर्पी पाटीजवळील महादेव मंदिरासमोर आले असता त्यांना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच २२ एन ७८६) त्यांना जोराची धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, मोटारसायकल स्वार हे ट्रकसोबत सुमारे एक हजार फुटापर्यंत फरफटत गेले. त्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती अंबड पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक शैलेश शेजुळ, जमादार के. बी. दाभाडे, साळवे, गोतीस, जाधव आदींनी धाव घेऊन पंचानामा केला. तिघांनाही शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये अंबड येथे दाखल करण्यात आले. मृत व्यक्ती ह्या एकाच कुटुंबातील असून एकमेकांचे चुलत भाऊ होते. मयत नारायण दत्तू एखंडे यांच्या मुलीचा ७ दिवसांपूर्वी विवाह झाला होता. एकाच घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.